
धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या वाघाची एन्ट्री? वाघ पाहिलेल्या व्यक्तीची तब्येत बिघडली!
धाराशिव – येडशी अभयारण्यात टिपेश्वर येथील वाघ आला त्याने घातलेला धुमाकूळ शांत झालेला नसताना तुळजापूर तालुक्यातील नंदगाव आणि धाराशिव तालुक्यातील सांगवी येथे आढळलेला प्राणी हा वाघ असल्याचे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आणि तो टिपेश्वर येथून आलेला वाघ असल्याचे देखील सांगितले तर दुसरीकडे टिपेश्वर येथून आलेला वाघ बार्शी तालुक्यात असल्याचे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वर वर पाहता हा संभ्रम वाटत असला तरी धाराशिव जिह्यातील वनविभाग माहिती लपवत असल्याचे चित्र आहे कारण, टिपेश्वर येथून आलेल्या वाघाने येडशी अभयारण्याला आपला अधिवास निश्चित केला असल्याने तो ते अभयारण्य सोडून थेट तुळजापूर तालुक्यात कसा गेला? जाताना नागरी, ग्रामीण भाग आहे. दोन राष्ट्रीय महामार्ग असताना तो तुळजापूर तालुक्यात कसा गेला? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
मात्र वाघाची एकंदरीत हालचाल पाहता धाराशिव जिल्ह्यात दुसरा वाघ आल्याचे आता बोलले जाऊ लागले असल्याने वनविभागाने अधिकृत माहिती जबाबदारीपूर्वक सांगावी अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे.
त्या व्यक्तीची तब्येत बिघडली
सोमवार दि. १६ जून रोजी धाराशिव तालुक्यातील सांगवी शिवारात हा वाघ आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून त्यापैकी भक्तराज दहीभाते यांची वाघ पाहिल्यानंतर घबराटीमुळे तब्येत बिघडली त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सध्या देखील त्यांची तब्येत अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत असल्याने वनविभाग आणि आरोग्यविभागाने त्यांच्यावर योग्य तो उपचार करायला हवा त्यांचे समुपदेशन करायला हवे अशी मागणी होत आहे.
सांगवी येथून जागजी परिसरात तो वाघ गेला
सांगवी येथे नव्या वाघाचे दर्शन झाल्यानंतर तो वाघ रेल्वे लाईन क्रॉस करून जागजी परिसरात गेला असून त्या परिसरात त्याने एका प्राण्याची शिकार केल्याचे काही नागरिक सांगतात. नवा वाघ वस्त्यांमधून जात असल्याने तो मॅन हिटर असल्याची शंका वर्तवली जात आल्याने वनविभागाने योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अन्यथा आंदोलन
नव्या वाघाबाबत ऐकू येत असलेली माहिती घबराट पसरवणारी असून सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी शेतात मुक्काम करत आहेत अश्या स्थितीत वाघाने हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाने वाघाचा अतीतातडीने बंदोबस्त करावा अन्यथा 20 दिवसांच्या काळात कुठलीही पूर्व सूचना न देता पूर्वी स्थगित केलेले आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.