
लेह-लडाखमध्ये जागतिक योग दिनानिमित्त भव्य कार्यक्रम — बिहारचे राज्यपाल आणि बौद्ध धर्मगुरू यांची महाबोधी मंदिरासंदर्भात चर्चा
लेह-लडाख येथे 15 मे 2025 रोजी जागतिक योग दिनानिमित्त एक भव्य आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला बिहार राज्याचे राज्यपाल महामहिम मा. आरिफ मोहम्मद खान यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.
या कार्यक्रमादरम्यान बिहारमधील प्रसिद्ध महाबोधी विहार (बोधगया) संदर्भात एक महत्त्वपूर्ण चर्चा घडून आली. या चर्चेमध्ये भिक्खू संघसेना महाथेरो, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खू संघ), तसेच डॉ. सत्यनामसिंग संधूजी (सांसद व कुलगुरू, चंदीगड युनिव्हर्सिटी, पंजाब) हे मान्यवर उपस्थित होते.
बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारशाचे जतन, तसेच महाबोधी विहाराच्या जागतिक महत्त्वाच्या दृष्टीने उचलावयाच्या पावलांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या संवादातून बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार, पर्यटनवृद्धी आणि सांस्कृतिक संवर्धनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान योगासने, ध्यानसत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध धर्मगुरू, विद्याविभूषित पाहुणे आणि शेकडो योगप्रेमींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.