महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कैलास शिंदे, व्हाईस चेअरमनपदी दत्तू कांबळे यांची बिनविरोध निवड

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कैलास शिंदे, व्हाईस चेअरमनपदी दत्तू कांबळे यांची बिनविरोध निवड

Spread the love

उमरगा (प्रतिनिधी) – महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कैलास शिंदे, व्हाईस चेअरमनपदी दत्तू कांबळे यांची बिनविरोध निवडउमरगा, दि. २५ जून २०२५: शहरातील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कैलास शिंदे तर व्हाईस चेअरमनपदी दत्तू कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी संस्थेच्या कार्यालयात प्राधिकृत अधिकारी एन. पी. हाडुळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ही निवड बिनविरोध करण्यात आली. निवडीनंतर नूतन चेअरमन आणि संचालकांचा सत्कार करण्यात आला.याचबरोबर, संस्थेची पंचवार्षिक निवडणूकही बिनविरोध पार पडली. यात संचालक मंडळात मत्सेंद्र सरपे, आप्पाराव गायकवाड, अभिमन्यू सूर्यवंशी, संतोष सुरवसे, रमेश जकाते, किरण सगर, अयोध्या कांबळे आणि हेमलता कोणाळे यांची संचालकपदी निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संचालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *