स्मरणशक्ती,एकाग्रता वाढीसाठी विद्यार्थ्यांनी नियमित योग करावा – जाधव

स्मरणशक्ती,एकाग्रता वाढीसाठी विद्यार्थ्यांनी नियमित योग करावा – जाधव

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी)  – शालेय विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती,एकाग्रता वाढीसाठी नियमित योग करावा. त्यामुळे गुणवत्ता वाढीला मदत होते. असे मत योगशिक्षक चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.
      शिंगोली (ता.जि.धाराशिव) येथील आश्रम शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रकांत जाधव मार्गदर्शन करताना बोलत होते.
      मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण,क्रिडा शिक्षक सुधीर कांबळे,पर्यवेक्षक रत्नाकर पाटील,प्रशांत राठोड,आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार यांनी योगगुरू चंद्रकांत जाधव यांचा श्रीफळ,शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
     चंद्रकांत जाधव यांनी विद्यार्थांना योगा बद्दल माहिती दिली.भारतीयांची जगासाठी अनमोल भेट म्हणजे योग, निरोगी शरीरात निकोप मन वास करत असते.शरीर हीच आरोग्य संपदा आहे.विदयार्थ्यांनी रोज सकाळी पहाटे पाच वाजता उठून योग करावा,त्यामुळे आपले मन ऐकाग्र होते,शालेय विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती,एकाग्रता वाढीसाठी नियमित योग करावा. त्यामुळे गुणवत्ता वाढीला मदत होते. असे मत व्यक्त केले.
     हे जग गुणवत्तेचे असून स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी योग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना शवासन,ताडासन,पद्मासन, हलासन,शिर्षासन,वज्रासन, धर्नुआसन,प्राणायाम, सुर्यनमस्कार यांची प्रात्यक्षीक चंद्रकांत जाधव व सुधीर कांबळे यांनी दाखवून सर्वाकडून करून घेतली.
        यावेळी खंडू पडवळ,दिपक,खबोले, शानिमे कैलास,मल्लिनाथ कोणदे,विशाल राठोड,सचीन राठोड,वरिष्ठ लिपीक संजीवकुमार मस्के,सुरेखा कांबळे, श्रद्धा सुर्यवंशी,ज्योती राठोड,ज्योती साने,बालिका बोयणे, वैशाली शितोळे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सागर सुर्यवंशी, अविनाश घोडके, सचीन अनंतकळवास,रेवा चव्हाण व विद्यार्थी कार्यक्रमासाठी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *