अहमदिया मुस्लिम युवक संघाचा वार्षिक इज्तेमा आणि रक्तदान शिबिर: ज्ञान, खेळ आणि समाजसेवेचे संगम

अहमदिया मुस्लिम युवक संघाचा वार्षिक इज्तेमा आणि रक्तदान शिबिर: ज्ञान, खेळ आणि समाजसेवेचे संगम

Spread the love

मजलिस खुद्दामुल अहमदिया उस्मानाबाद (अहमदिया मुस्लिम युवक संघ) यांनी 31 मे आणि 01 जून रोजी वार्षिक इज्तेमा उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमात युवक सदस्य आणि लहान मुलांनी विविध खेळ व शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

पहिल्या दिवशी इज्तेमाच्या मैदानावर रंगतदार वातावरण होते. विविध खेळ, भाषण, कविता वाचन व कुराण पठण स्पर्धा पार पडल्या. प्रश्नमंजुषा स्पर्धांमुळे सहभागींच्या ज्ञानाची कसोटी लागली. याशिवाय, ज्ञानवर्धक माहिती देणारी प्रदर्शनीही उभारण्यात आली होती, ज्यात विविध विषयांची माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली.

31 मे रोजी सकाळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने, खिदमते खल्क विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित झाले. महिलांनी व पुरुषांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्तदात्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शिबिरात डॉक्टर उज्वला गवळी मॅडम (डीन), सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, डॉ. तंदाळे, डॉ. विवेक कोळगे, डॉ. बंगर, विठ्ठल कांबळे, निखिल, प्रतीक मोरे, भुरे मॅडम, तिरुपती केंद्रे, जाकीर शेख आदींनी योगदान दिले. डीन मॅडमनी मजलिसच्या कार्याचे कौतुक केले. रक्तदात्यांमध्ये सर्वदे दैविशल, प्रचारक नासिर खान, तारिक अहमदी, अब्दुल नईम, अब्दुल कय्यूम नासिर, नदीम अहमद, मामून खान, राग़ेब अलीम आदींनी सहभाग घेतला.

01 जून रोजी सायंकाळी समारोप सोहळा पार पडला. क्रीडा आणि शैक्षणिक स्पर्धांतील विजेत्यांना ट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. हा सोहळा मजलिसच्या मूल्यांची आठवण करून देणारा ठरला.

या दोन दिवसीय इज्तेमात अहमदीया मुस्लिम युवक संघाचे राग़ेब अलीम, अध्यक्ष जमात डॉ. बशारत अहमद, अब्दुल लतीफ, अब्दुल अलीम, प्रचारक मक़बूल अहमद, प्रचारक राशिद अहमद, इल्यास अहमद, मुताहिर अहमद, सजील अहमद, आदिल अहमद, अताऊल बाक़ी, मोनिस अहमद, शफीक अहमद, माजीन अहमद, आकिफ अहमद, मंजूम अहमद, फौजान अहमद, फरहाद अहमद, वकार अहमद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *