सीना कोळेगाव धरणावर आपत्ती व्यवस्थापन पथकाची रंगीत तालीम यशस्वीपणे पार

सीना कोळेगाव धरणावर आपत्ती व्यवस्थापन पथकाची रंगीत तालीम यशस्वीपणे पार

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) — डोमगाव (ता. परंडा) येथील सीना कोळेगाव धरण परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन पथकाची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) मोठ्या शिस्तबद्ध व कार्यक्षमतेने पार पडली. ही तालीम किर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी, आणि  रितु खोखर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत घेण्यात आली.

या तालमीचा उद्देश धरण परिसरात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्तीस्थितींचा सामना करण्यासाठी विविध विभागांची समन्वयित तयारी तपासणे आणि आपत्ती व्यवस्थापनातील तांत्रिक बाबींचा सराव करणे हा होता.

या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वैशाली तेलोरे, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ, तहसिलदार निलेश काकडे, तहसिलदार जयवंत काकडे, पोनि दिलीपकुमार परेकर (परंडा पोलीस ठाणे), सपोनि गोरक्षनाथ खरड (अंबी), सपोनि प्रविण सिरसट (परंडा), जिल्हा संधारण अधिकारी पी. के. महामुनी, गटविकास अधिकारी राउत, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, सहायक अभियंता आर. बी. माने, डॉ. साचे यांच्यासह पोलीस विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धरणाच्या सुरक्षा उपाययोजना, आपत्कालीन प्रतिसाद, बचाव कार्य, स्थानिक प्रशासन व नागरिकांमधील समन्वय इत्यादी मुद्द्यांवर या रंगीत तालमीत भर देण्यात आला. सर्व संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आणि भविष्यातील आपत्ती परिस्थितीत तयार राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

या तालमीमुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून, धरण परिसरातील जनतेला सुरक्षित ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *