भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) –  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेच्या मुख्य कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील दूधगांवकर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्यांची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर कामगार हक्कांचेही महान संरक्षक होते. त्यांनी ८ तासांचा कामाचा दिवस कायदेशीर केला, महिला कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणल्या, किमान वेतन, कामगार विमा, आणि ट्रेड युनियनच्या हक्कांना बळकटी दिली. त्यांचे योगदान म्हणजे आजच्या कामगार वर्गाला मिळालेल्या सन्मानाचे मूळ आहे.

कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव, कायदेशीर सल्लागार ऍड. कमल मदने, आकाशवाणीचे ज्येष्ठ वृत्तनिवेदक आशिष लगाडे, पी. डी. कांबळे सर, सुरेश मदने सर, बाळासाहेब माळी, सुनील गायकवाड, किशोर सरवदे, सतीश चव्हाण, सद्दाम तांबोळी, कविता चंदनशिवे, अनिता भालेराव आणि इतर मान्यवर व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि शिक्षणाबाबतचे विचार पुन्हा एकदा उजळून निघाले. उपस्थितांनी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले आणि त्यांचा आदर्श जीवनमार्ग अनुसरण्याचा संकल्प व्यक्त केला.

संघटनेच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून, उपस्थितांमध्ये राष्ट्रनायकाबद्दलची निष्ठा आणि अभिमान स्पष्टपणे दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *