
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त विकासकामांची मागणी
धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी (सोनाखळी), ता. कळंब येथील श्री क्षेत्र पापनाश देवस्थान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी त्यांनी बांधलेले हेमाडपंथी मंदीर, बारव आणि त्यांच्या आईंची समाधी आजही अस्तित्वात आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त, या ऐतिहासिक ठिकाणाच्या जिर्णोद्धार व पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या विकास कामांमध्ये मंदीराचा जिर्णोद्धार, त्यांच्या स्मरणार्थ पुतळा, जीवनचरित्र दृश्यकला, भक्तनिवास उभारणी आणि रस्त्यांचे पुनरुत्थान यांचा समावेश आहे.
भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडून तातडीने लक्ष देण्याची मागणी मौजे चोराखळीचे सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी प्रा सोमनाथ लांडगे, लिंबराज डुकरे, दिगंबर मैदाड, अक्रूर सोनटक्के, एडवोकेट रवींद्र मैंदाड, ऍड.जयश्री तेरकर, ऍड. बबीता मैंदाड,ऍड. माने मॅडम ,राजू कुचेकर, अमोल मैंदाड, सुभाष अशोक मैंदाड व इतर आदी समाज बांधव उपस्थित होते
