धाराशिव, दि. 30 – महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या मोठ्या मताधिक्याने निवडून येवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतील. त्यांच्या विजयासाठी सर्व रिपाइंचे कार्यकर्ते आणि दलित बांधवांनी एकदिलाने...

READ MORE

धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यात धारशिव मध्ये मतदान होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने या मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला आहे. काशी विश्वेश्वरप्रमाणेच तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा कायापालट...

READ MORE

माजी सैनिकांचा भाजपात प्रवेश



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन माजी सैनिकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी सैनिक प्रभाकर हाके, मधुकर वाघमोडे, प्रमोद जाधव, नारायण जाधव, पोपटराव जाधव, शिवराम पारेकर, अश्रू लोकरे, शिवाजीराव चव्हाण, लिंबाजी पौळ, साहेबराव झोरे, शिवाजी पेंडपाले, बाळराजे पाटोळे, शहाजी पगारे, प्रभाकर अवताडे, बाळासाहेब जाधव, पांडुरंग खोसे, मारुती माने यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या सर्वांनी सांगितले.

यावेळी भूम तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी संतोष सुपेकर, महादेव वडेकर, बाळासाहेब शिरसागर, दिनेश पौळ, बाबा वीर, प्रदीप साठे, शांतीराज बोराडे, अमोल लोंढे, दयानंद बोराडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.