
पांडुरंग घोडके यांच्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार’
धाराशिव (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पांडुरंग घोडके यांच्या संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मंगळवार, दिनांक 10 जून 2025 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, समाजकल्याण मंत्री मा. संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास जलसंधारण मंत्री संजय राठोड, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, तसेच प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांचीही उपस्थिती लाभली.
गेल्या 24 वर्षांपासून पांडुरंग घोडके यांच्या संस्थेने महिलांचे सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण, शेतकरी आत्महत्यांची समस्या, कृषी, आरोग्य व सामाजिक कार्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल शासनाने घेतली.
त्यामुळे संस्थेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.
या कार्यक्रमासाठी पांडुरंग घोडके यांचे कुटुंबीय मुंबईतील ‘ड्रायडेंट’ या पाचतारांकित हॉटेलमध्ये सन्मानपूर्वक निवासासाठी थांबवले गेले होते.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी शुभांगी घोडके, पुण्यातील इन टू इट सोलूशन कंपनीचे प्रमुख संतोष खवळे, तसेच त्यांचा मुलगा प्रतीक घोडके हे उपस्थित होते.
या गौरवप्राप्तीबद्दल पांडुरंग घोडके यांनी सांगितले, “शासनाकडून मिळालेला हा पुरस्कार आमच्या संस्थेच्या कामाची पावती आहे. यामुळे नवीन उमेदीने समाजासाठी अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. शासनाच्या या सन्मानाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.”