
“आय एम विनर” स्पर्धा परीक्षेत सारोळा बुद्रुक शाळेचा बहारदार विजय – विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सारोळा बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी “आय एम विनर” या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे. विविध स्तरांवर स्पर्धेत भाग घेत शाळेच्या २१ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
या स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
धनराज बाकले, श्रेयश लिंगे, कल्याणी मिटकरी, जयराम मसे, कुदळे अक्षय, शिंदे श्रेयश, गाढवे अनन्या, खरे राजलक्ष्मी, चंदने स्वरा, कोल्हे शिवाई, तवले स्वरा, जगदाळे आकांक्षा, स्वामी स्नेहा, देवगिरे गौरी, साठे स्वप्निल, पाटील प्रगती, रजपूत श्रेया, देवगिरे आरोही
या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व बक्षिसाने गौरवण्यात आले. शाळेच्या व गावाच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
तसेच वर्षभर घेतलेल्या क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर स्पर्धांतील विजेत्यांचेही गौरव करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.
या यशाबद्दल मुख्याध्यापक वनकळस सर, सरपंच निर्मला चंदने, उपसरपंच वैभव पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव आप्पा खरे, उपाध्यक्ष दीपक रणदिवे, सदस्य माऊली माने, मुजावर ताई, लाईनमन दत्ता कुंभार व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.