आजचा अर्थसंकल्प म्हणजे साखरेच्या पाकात बुडविलेलं गाजर,खासदार ओमराजेचा केंद्र सरकावर निशाणा

आजचा अर्थसंकल्प म्हणजे साखरेच्या पाकात बुडविलेलं गाजर,खासदार ओमराजेचा केंद्र सरकावर निशाणा

Spread the love

धाराशिव ता. 23: या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांमधील असंतोष अजून वाढेल हे दिसत आहे.  शेतीबाबत मोठा कळवळा असल्याचे दाखवणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात शेतकऱ्याला साखरेच्या पाकात बुडवलेलं गाजरच दिलं आहे अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.
मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर तरी जनतेच्या व्यथा गृहीत धरून अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक होत. पण हा अर्थसंकल्प अत्यंत खेदजनक आणि निराशाजनक आहे. हे बजेट देशाचे होत की उपकाराची परतफेड करण्यासाठी दोन राज्याच आहे हे कळत नाही. आंध्र प्रदेश व बिहार यांना बजेटमध्ये मिळालेलं स्थान हे सरकार किती स्थिर आहे याच बोलक उदाहरण असून ते  देशासमोर आलं आहे.जे महाराष्ट्र एवढ्या मोठया प्रमाणात कर देत त्या राज्याला मात्र तुलनेन काहीच मिळालेलं नसल्याने केंद्राचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा दिसून आला आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक अर्थसंकल्पात उत्पादन वाढीचे गाजर दाखवलं जात पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी पीकविलेल्या शेतीमालास चांगला दर देण्याचा सरकारला विसर पडतो. मोठे आकडेवारी देऊन खूप काही दिल्याचे कागदावर दाखवलं जात वास्तवात त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. आयात निर्यात धोरणाचा शेतीमालास वारंवार बसणारा फटका यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल ही अपेक्षा देखील फोल ठरली आहे. सामाजिक न्यायाचे प्रतिबिंब बजेटमध्ये दिसायला हवं पण मूळ गाभा सरकार विसरणं हे लोकशाही धोक्यात आल्याचं लक्षण असल्याचेही स्पष्ट मत खासदार ओमराजे यांनी व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *