
केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न-आमदार कैलास पाटील
धाराशिव ता. 23: बोलघेवड सरकार आणि त्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प देखील असाच स्वप्नांच्या जगात हरवून गेलेला आहे. या स्वप्नांच्या दुनियेत देशातील जनतेला फिरवून आणण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
निवडणुकीत ज्या राज्यात भाजपा व महायुतीला लोकांनी झटका दिला त्या राज्यात केंद्राने आकसबुद्धीने व्यवहार केल्याचं दिसून येत आहे. राज्याकडून केंद्राला विविध करातून मोठा वाटा मिळतो पण केंद्राकडून त्या प्रमाणात काहीच मिळत नाही. यंदा तर हे प्रमाण अजून कमी झाल्यानं सरकारची महाराष्ट्रवरील रागच व्यक्त केला आहे. त्यातही दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे तर सरकारने बदल्याचीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे. राजकीय पक्षाकडून सरकार मध्ये गेल्यावर उलट ती चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. पण हे सरकार चूक मान्य करण्यापेक्षा लोकांवर राग काढत आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात नेहमीप्रमाणे वलग्नाच केल्या आहेत. शेतीमालच्या हमीभावावर हे सरकार ब्र शब्द काढत नाहीत. उत्पादन वाढवू त्यासाठी अमुक योजना ही तर ठरलेली वाक्य जनतेला पाठ झाले आहेत. आयात निर्यात धोरणावर चकार शब्द नं काढणार सरकार दुसऱ्या बाजूला आपल सरकार टिकावं म्हणून दोन राज्यात निधीचा वर्षाव करत आहे. देश म्हणून सरकारने हा अर्थसंकल्प मांडला की सरकार वाचविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दलित, मुस्लिम, आदिवासी, तरुण, वाढती बेरोजगारी व महागाई आदी प्रश्नावर सरकार सपशेल अपयशी ठरल आहे .