‘त्या’ पक्षांतरामध्ये काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्यांचा समावेश नाही – शेरखाने
शिवसेनेने आपले कार्यकर्ते संभाळावेत
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना (ठाकरे) मध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या आहेत. मात्र, प्रवेश केलेल्यापैकी एक देखील काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही. त्यामुळे ते काँग्रेसचे नसून इतर कोणत्या पक्षाचे आहेत ? याचा शोध घ्यावा. तसेच, काँग्रेस कार्यकर्त्यांचा मित्र पक्षात प्रवेश, काँग्रेसला खिंडार अशा खोडसाळ बातम्या देणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण मुख्य संघटक जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवचे राजाभाऊ शेरखाने यांनी केले आहे.
जिल्ह्यातील काहीजणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असल्याचा बातम्या आहेत. मात्र, पक्षप्रवेश केलेला एकही काँग्रेसचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी देखील नाही. त्यामुळे यापुढे अशा बातम्या देण्यापूर्वी खात्री करून मगच ते काँग्रेस पक्षाचा असल्याचा दावा करावा. विशेष म्हणजे आघाडी धर्माचा धर्म पाळणारा काँग्रेस पक्ष असून आम्ही आघाडीतील मित्र पक्षातील कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देत नाहीत. उलट शिवसेनेचे जुने व निष्ठावंत शिवसैनिक काँग्रेसच्या संपर्कात आहेत. तरी देखील त्यांना प्रवेश दिला नाही व देणार देखील नाही. विशेष म्हणजे शिवसेनेचेच काही कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, त्यांना अगोदर रोखावे, असे आवाहन मुख्य संघटक जिल्हा काँग्रेस कमिटीचे राजाभाऊ शेरखाने यांनी केले आहे.
