अवैध गुटखा वाहतुक करणारे 2 आरोपी स्थानिक गुन्हेशाखेने केले गजाआड

अवैध गुटखा वाहतुक करणारे 2 आरोपी स्थानिक गुन्हेशाखेने केले गजाआड

Spread the love


धाराशिव जिल्ह्यातील अवैध धद्यांविषयक व मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे कामी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि श्री. अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ/अश्विन जाधव, दिलीप जगदाळे, विनोद जानराव, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे,पोना/ नितीन जाधवर, अशोक ढगारे,  चालक पोहेकॉ/संतोष लाटे, पोअं/ प्रशांत किवंडे, यांचे पथक दि.17.05.2024  रोजी मुरुम पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक अशोक लेलॅड कंपनीचे वाहना क्र एमएच 44 यु 2405 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखाची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर वाहन थांबवून चेक केले असता  सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. तसेच वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता  त्यांनी त्यांचे नाव  नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया  कॉलनी बीड ता. जि. बीड असे सागिंतले. तसेच पथकाने त्यांचे ताब्यातील नमुद वाहनातुन हिरा पान मसाला 64 पोते,  विमल पान मसाला 5 मोटे पोते, व्ही- 1 तंबाखु एक खाकी रंगाचे पोते, महा रॉयल 717 तंबाखु 32 हिरवट रंगाचे पोते, आओबाजी पान मसाला 15 पोते, रॉयल 220 तंबाखु 14 पोते, हिरा पान मसाला 14 पोते, रॉयल 717 तंबाखु 7 पोते, बॅग, पॉकेट सह अशोक लेलॅड कंपनीचे वाहन क्र एमएच 44 यु 2405  असा एकुण  28, 89, 740 ₹ किंमतीचा माल मिळून आला. मिळून आलेला जप्त करुन माल सह आरोपी नामे-1) नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, 2) हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया  कॉलनी बीड ता. जि. बीड यांना ताब्यात घेवून आरोपी  विरुध्द पोलीस ठाणे मुरुम येथे गुरनं 124/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस मालासह मुरुम पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली  सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ/अश्विन जाधव, दिलीप जगदाळे, विनोद जानराव, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे,पोना/ नितीन जाधवर, अशोक ढगारे,  चालक पोहेकॉ/संतोष लाटे, पोअं/ प्रशांत किवंडे,यांच्या पथकाने केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *