
छावा संघटनेच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी बागल
धाराशिव – अखिल भारतीय छावा संघटनेच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी सचिन बागल यांची निवड करण्यात आली आहे.
छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र बागल यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव ज्योतिराम काळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष रवी साळुंके, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे सदस्य बालाजी सातपुते आदी उपस्थित होते.