
सौ. कमल घुले संस्थेच्यावतीने आधाराच्या काठ्यांचे वाटप
परंडा – सौ कमल भिमराव घुले बहुउद्देशीय संस्था भूम व डाॅ.राहुल घुले आरोग्य मित्र परिवार भूम परंडा वाशी यांच्या संकल्पनेतून परंडा शहरातील जेष्ठ नागरिकांना २०० आधाराच्या काठ्यांचे डॉ राहुल घुले यांच्या हस्ते वाटप दि.१५ मे रोजी करण्यात आले.
परंडा तालुक्यातील डोजा गणेश नेटके यांची तर शेळगाव नवनाथ खरसडे यांची व लोणी सर्कल व आनंद वायकुळे यांची सोशल मिडिया प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. तसेच कुंभेफळ येथील अब्दुल पटेल, डोंजा येथील आंनद देशमुख, मुंगाव येथील नवनाथ गायकवाड यांनी या आरोग्य परिवारात जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भूम परंडा वाशी तालुक्यातील सर्व टिमने सहकार्य केले.