शासकिय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Spread the love

धाराशिव शहर पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) विलास लोकरे, 2) बिरुदेव बनसोडे, 3) प्रथमेश खळदकर, 4) शुभम लोकरे, सर्व रा. इंगळे गल्ली धाराशिव  ता.जि. धाराशिव, 5) रोहीत अमर दबडे व इतर 10 ते 12 इसम यांनी दि.14.05.2024 रोजी 18.30 ते 21.00 वा. सु. देशपांडे स्टॅड जवळील गणपती मंदीर समोर रोडवर धाराशिव येथे  सन्मित्र समाज तरुण मंडळाचे पदाधिकारी यांनी विनापरवाना छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणुक काढून डिजे मोठ्या आवाजात बंदी घातलेले गाणे वाजवून डिजे चा आवज कमी करण्यास सांगणाऱ्या पोलीस अंमलदार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच गैरकायद्याची मंडळी जमवून देशपांडे स्टॅड समोरील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली सह आडवे लावून व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा रोडवर ठेवून राष्ट्रीय महामार्ग बंद करुन (रास्ता रोको) केला. त्यांना रोडवरुन बाजूला होण्यास तसेच रोडवरुन ट्रॅक्टर ट्रॉली सह  छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बाजूला घेण्यास सांगत असताना नमुद आरोपींनी  शिवीगाळ, दगडफेक करुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. विना परवाना मिरवणुक काढून डिजे लावून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे  उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- फिर्यादी नामे-सच्चिदानंद श्रध्दानंद स्वामी, वय 32 पोलीस अंमलदार/1768 नेमणुक पोलीस ठाणे धाराशिव शहर यांनी दि.15.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 353,332, 153(अ), 143, 147, 149, 323, 504, 188 भा.दं.वि.सं. 135 म.पो.का.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *