लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान केंद्रावर मिळणार किमान आवश्यक सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
मतदान केंद्रावर मिळणार किमान आवश्यक सुविधा

Spread the love


धाराशिव दि.3 (प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने येत्या 7 मे रोजी 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहे.ज्या मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध नाही,अशा मतदान केंद्रावर त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे. यामध्ये पिण्याचे पाणी वीस लिटरचे जार,50 डिस्पोसल ग्लास,मतदान केंद्राकडे, रॅमकडे, स्वच्छतालयाकडे (स्त्री-पुरुष),पिण्याची पाणी,मतदान सहाय्यता केंद्राकडे व हिरकणी कक्ष असे माहिती फलक, प्रथमोपचार पेटी,आवश्यक फर्निचर यामध्ये आवश्यकतेनुसार लाकडी टेबल,दहा प्लास्टिक खुर्च्या,आवश्यकतेनुसार एका ट्यूबलाइटची प्रकाश व्यवस्था, स्वच्छता कामगार,साधा मंडप यामध्ये साईट पट्टीसह मतदारांना रांगेत थांबण्यासाठी व्यवस्था, पाच प्रकारची लहान मुलांची खेळणी असलेले पाळणाघर,आवश्यकतेनुसार मार्गदर्शक फलक,मतदान सहायता केंद्र यामध्ये साधा मंडप, साईडपट्टीसह,लाकडी टेबल, प्लास्टिक खुर्ची,बॅनर (मतदान सहायता केंद्र) हे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *