
मतदार जनजागृती कार्यक्रम
औसाच्या मुक्तेश्वरच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून दिला मतदार जागृती संदेश
धाराशिव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 40 – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 07 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने औसा तहसील कार्यालय येथे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.याचाच भाग म्हणून औसाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे आणि तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात 1 मे रोजी श्री मुक्तेश्वर विद्यालय येथे मानवी साखळी तयार करण्यात आली.या साखळीतून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.
मतदानाची टक्केवारी वाढली जावी यासाठी निवडणूक आयोगाच्या स्वीप विभागाअंतर्गत तहसील कार्यालय औसा येथून सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची मोटार बाईक रॅली काढण्यात आली.यावेळी रॅलीत सहभागी झालेले अधिकारी कर्मचारी यांच्या हातात मतदान जनजागृतीचे फलक होते.
दरम्यान श्री मुक्तेश्वर विद्यालय औसा येथे भारताच्या नकाशामध्ये विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करण्यात आली.या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीमध्ये आपल्या शेजारी असलेल्या किमान 25 घरांमध्ये जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी नायब तहसीलदार इंद्रजीत गरड,गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे,नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे, गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप पथकाचे नोडल अधिकारी गोविंद राठोड,मुख्याध्यापक शरणप्पा जनसकरे,मुख्याध्यापक शिवकुमार मुर्गे,दीपक क्षीरसागर यांच्यासह श्री मुक्तेश्वर विद्यालय,अजीम विद्यालय व श्री वीरभद्रेश्वर विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी मानवी साखळीत सहभाग नोंदविला.यामुळे नक्कीच या उपक्रमांमधून 239 – औसा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार