लोकसभा सार्वत्रिक निवडणुकसुक्ष्म निरिक्षकांची कार्यशाळा संपन्न

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक
सुक्ष्म निरिक्षकांची कार्यशाळा संपन्न

Spread the love



धाराशिव दि.03 – येत्या 7 मे रोजी होणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी  1 मे  रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे सुक्ष्म निरिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये वय वर्षे 85 पेक्षा जास्त असणारे वयस्कर मतदार व दिव्यांग मतदार यांच्या मतदानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
  
40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 12 एप्रिल 2024 ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत वय वर्षे 85 पेक्षा जास्त असणारे वयस्कर मतदार व दिव्यांग मतदार यांचेकडून नमुना 12-ड भरुन घेण्यसाठी जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात आली. 40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी एकुण 4549 मतदारांनी नमुना 12-ड भरुन दिले आहेत. सर्व नमुना 12-ड ची पडताळणी पुर्ण केल्यानंतर मतदान करण्यास पात्र मतदारांची संख्या 4393 इतकी अंतिम करण्यात आली आहे. यामध्ये 85 वर्षे पेक्षा जास्त वय वयस्कर मतदार, दिव्यांग मतदार 851, असे एकुण 4393 इतके.
          
85 वर्षेपेक्षा जास्त  वयस्कर मतदार व दिव्यांग मतदार यांचे 2 मे 2024 पासुन ते 5 मे 2024 या कालावधीत विशेष गृहभेट पोस्टल मतपत्रिका मतदान पथकामार्फत दिनांक निहाय  व गावनिहाय नियोजन करण्यात आले.
         या कार्यशाळेस निवडणुक निरिक्षक (सामान्य) प्रमोद उपाध्याय, जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी (भूसंपादन, मांजरा प्रकल्प) उदयसिंह भोसले यांनी मा्रगदर्शन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पं.जि.प. गोडभरले, सहजिल्हा निबंधक जानकर, सहजिल्हा निबंधक कल्याण कुलकर्णी, नायब तहसिलदार श्वेता घोटकर,महसुल सहाय्यक नागनाथ राजुरे, महेश क्षीरसागर, रेणुका राठोड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *