पालकमंत्री प्रताप सरनाईक १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात
धाराशिव (प्रतिनिधी) परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १६ व १७ सप्टेंबर रोजी दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
१६ सप्टेंबर रोजी दुपारी १:१५ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून खाजगी मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी २:१५ वाजता तुळजापूर येथे आगमन व शारदीय नवरात्र महोत्सव – २०२५ तुळजापूर येथील विविध स्थळाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा बैठक मंदिर संस्थानच्या प्रशासकीय भवनात घेतील.सायंकाळी ५:३० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथून खाजगी वाहनाने शासकीय विश्रामगृह धाराशिवकडे प्रयाण.सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजतापर्यंत जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक व विश्रामगृह येथे मुक्काम.
१७ सप्टेंबर रोजी सकाळी ८:२५ वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिव येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवकडे प्रयाण.सकाळी ८:३५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आगमन.सकाळी ८:४५ वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण येथे उपस्थिती.सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून खाजगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे प्रयाण.सकाळी १०:१० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे आगमन व उम्मीद निदान केंद्र आणि रक्त साठवण केंद्राचे उद्घाटन करतील.सकाळी १०:५० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे प्रयाण.सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आगमन व ४५ मीटर ध्वज उभारणी कार्यक्रमाचे भूमिपूजन करतील.दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून खाजगी वाहनाने छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाने ठाणेकडे प्रयाण करतील.
