इतिहास हा जीवनाचा नंदादीप आहे – रामदास आण्णा कोळगे
धाराशिव (प्रतिनिधी) – भविष्यात जीवन प्रकाशमान करण्यासाठी इतिहास महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो. पाठीमागील काळात आपल्यातील देश भक्तांनी प्राण्याची आहुती दिली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्म्याचे स्मरण करणे आवश्यक आहे. घराची काळजी न करता आपल्या देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या परिश्रमाचे फळ आपल्याला मिळाले तो इतिहास आपण आठवला पाहिजे कारण त्याच इतिहासातून आपल्या जीवनात नंदादीप लावत असतो असे मत स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथ आबा कोळगे सोसायटी रुईभर संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जयप्रकाश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथे खुल्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामदास आण्णा कोळगे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की मराठवाडा मुक्ती संग्रामातील धाराशिव जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे होते. हैदराबाद संस्थानातील अन्याय , अत्याचाराच्या जुलमी राजवटीला बऱ्याच ठिकाणी विरोध होत होता. त्यात प्राणाची आहुती देत जे हुतात्मा झाले त्यांना आठवणीत ठेवून आपण आपले भविष्य उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्य सेनानी कै विश्वनाथ आबा कोळगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले. या स्पर्धेत एकूण स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या सर्व विजयी स्पर्धकांना 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढ्याबद्दल स्पर्धकांनी त्यांच्या कार्याचा आढावा देत त्यांचे धाडस, अन्याय विरुद्ध लढण्याचा भाव सांगितला प्रत्येकानी जुलमी राजवटीला थारा न देता त्याचा विरोध करून जुलमी राजवटी विरोधी लढणारे लढवले खरोखरच समाजाला आदर्श बनले असे मत स्पर्धकांनी प्रकट केले.या स्पर्धेत प्रथम गुरव वसुंधरा संजय , द्वितीय गिल्डा संजीवनी कांतीलाल , तृतीय जाधव अनुजा भगवान, उत्तेजनार्थ ढोले श्रावणी बाबासाहेब असे अनुक्रमाने आले आहेत.जयप्रकाश विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांच्यातर्फे उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येकी 500 रुपयांचे बक्षीस वितरित होणार आहेत. अनुक्रमे प्रथम यादव विद्या विक्रम, द्वितीय गायकवाड वैभवी पांडुरंग, तृतीय सुतार श्रद्धा ज्ञानेश्वर, तर उत्तेजनार्थ ढवळे वैष्णवी पद्माकर यांना 17 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहेत.गुणदानाचे काम विकास क्षिरसागर सचिन कांबळे, अभिजित घोळवे , वेळ नियत्रंक प्रसन्न धर्माधिकारी यांनी काम पाहिले.
याप्रसंगी माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , कौशल्य विकास सहाय्यक , धाराशिव येथील श्री संजय गुरव ,प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री विनय सारंग यांनी केले.
