जयप्रकाश विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान
धाराशिव : – तालुक्यातील रुईभर येथे दि ८ सप्टेंबर रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान व साक्षरता दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवचे प्राचार्य दयानंद जटनुरे व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुण्यनगरी धाराशिव जिल्हाप्रमुख मा श्री धनंजय रणदिवे, अधिव्याख्याते डॉ शिंदे सर उपस्थित होते.
प्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते हार व श्रीफल अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक शिक्षकांनी अध्ययन परिपूर्ण करणे आवश्यक आहे. आपल्या विषयात सखोल ज्ञान घेऊन अध्यापन केले तर ते अधिक प्रभावशाली होऊ शकते. प्रत्येक शाळेत अध्ययन व अध्यापन हे प्रभावी झाले पाहिजे असे मत व्यक्त केले तर साक्षरता दिनानिमित्त देशाची उन्नती साधायची असेल तर प्रत्येकानी साक्षर होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्या संस्थेतील प्रत्येक शिक्षक हा आदर्श आहे. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेऊन आपले भविष्य उज्वल बनवले पाहिजे. आपल्या संस्थेत असे वारंवार कार्यक्रम होत असतात त्यातून विद्यार्थ्यांनी काहीतरी बोध घ्यावा हीच अपेक्षा असते. आपल्या संस्थेतून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उच्च पदावर विद्यार्थी विराजमान आहेत तसेच आपण ही उच्च पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करून आपले भविष्य उज्वल करावे व ज्ञानी व संस्कारी बनवून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रमुख मा श्री धनंजय रणदिवे यांनी ही मार्गदर्शन करताना म्हणाले की ग्रामीण भागात शिक्षणाचे रोपटे लावून त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी दादांचे परिश्रम महत्त्वाचे आहेत. त्यांच्या कार्यातून शिक्षणाच्या प्रती असलेले प्रेम व समाजा प्रति असलेली जिम्मेदारी आपल्याला घेण्यासारखे गुण आहेत . आपल्याला ज्यांच्या मार्फत ज्ञानार्जन मिळते त्यांच्या आपल्याकडून सन्मान ही झाला पाहिजे. शिक्षक हे ज्ञानार्जन करतात मात्र शिक्षणात ग्रामीण भागात दादा हे पांडुरंग आहेत असे म्हणणे सुद्धा वावगे ठरणार नाही. त्यांच्याकडून दीर्घकाळ मार्गदर्शन लाभण्याची ही अपेक्षा व्यक्त केली. जीवनात उन्नती साधावयाची असेल तर परिश्रम व मेहनतीशिवाय पर्याय नाही मेहनत करण्याची तयारी प्रत्येकानी ठेवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनीही मार्गदर्शन करताना म्हणाले की आज साक्षरता दिन ही साजरा केला जातो. प्रत्येकाला वाचता व लिहिता आले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला वाचन शिकवून त्यानंतर गल्ली, गाव याकडेही लक्ष देऊन वाचन शिकवले पाहिजे. वाचनाचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडून या प्रसंगी करून घेतले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण ही त्यांनी दिले. अभ्यास करताना कधीही सुविधांचा विचार न करता वाचनाची आवड असणे महत्त्वाचे आहे. आपल्या संस्थेचे डॉ आंबेडकर यांचे नाव आहे यातूनच महान कार्य लक्षात येते. सर्व विद्यार्थ्यांना वाचन आले पाहिजे आज आपल्या जिल्ह्यात 63 % विद्यार्थ्यांना वाचता येते. मात्र प्रत्येक कृतीतून वाचन किती सोपे आहे हे या प्रसंगी दाखवून दिले. शाळेत शिस्त व शिक्षण हेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी आत्मविश्वास आला पाहिजे असे मत व्यक्त केले.
विद्यालयाचा माजी विद्यार्थी अभय घोडके याने सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचे अनुभव या प्रसंगी व्यक्त केले. विद्यालयातील माजी विद्यार्थी अभय घोडके यांनी सेट परीक्षेत उत्तीर्ण व लिंबराज वडवले यांनी समाज कल्याण अधिकारी, बीड येथे नवनियुक्ती मिळाल्यामुळे दोघांचाही सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून करण्यात आला.
याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आगतराव भोईटे, शिवाजी पवार गुरुजी, श्री गणपत बप्पा माने, शिवाजी बारगुळे गुरुजी, पोपट नलावडे गुरुजी, नारायण वडवले , इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश शेटे व श्री सचिन कांबळे यांनी तर आभार श्री काकासाहेब डोंगरे यांनी केले.
