देवधर्म आणि अंधश्रद्धेच्या बाहेर पडल्याशिवाय मातंग समाजाचे भले होणार नाही.
सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग घोडके
कळंब – मातंग समाज देवधर्म, अंधश्रद्धा याच्यात गुरफटलेला असून व्यसनाधीनतेमुळे घरात होणारी भांडणे त्याच्या दारिद्र्याचे कारणे आहेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा, वारणेचावाघ या कादंबरीतून सामाजिक व्यवस्थेमुळे उपासमार, होणारे अन्याय, या विरोधात केलेला संघर्ष समाजासमोर आणला आहे , विश्वासाने काम व नैतिकता ठेवल्यावर काम करता येते देशाच्या समतेचा विचार व माणसाला जागे करण्यासाठी संघर्ष पाहिजे असे विचार व्याख्याते पांडुरंग घोडके यांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व मातंग समाज दशा आणि दिशा या विषयावर बोलत असताना व्यक्त केले छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृह येथे दिं.२७ ऑगस्ट रोजी क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ शाखा कळंबच्या वतीनै आयोजित कार्यक्रमात बोलत असताना व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सोमनाथ कदम राज्य कार्याध्यक्ष लसाकम कणकवली हे होते तर मंचावर नरसिंग घोडके राज्य नियंत्रक लसाकम लातूर, राजकुमार नामवाड लसाकम महासचिव, मधुकर खिल्लारे लसाकम सचिव, विश्वनाथ (आण्णा) तोडकर प्रदेश अध्यक्ष लोकविकास मंच, प्रभाकर खंडागळे, एल.आर. धावारे, दि.बुद्धिस्ट सोसायटी जिल्हा धाराशिव यांची उपस्थिती होती याप्रसंगी नरसिंग घोडके यांनी आपल्या भाषणात वर्णव्यवस्थेत मातंग समाज हा अतिशूद्र असल्याने शोषित व उपेक्षित राहिला आहे त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव होऊ दिली नाही , त्याला व्यवस्था कळाली नाही, त्याचा व्यवस्थेने बळी घेतला आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास संविधान दिले , त्याचे आपण लाभार्थी आहोत संविधान व लोकशाही धोक्यात आहे, मनुवाद्यांनी विळखा घातला आहे प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे ,आम्ही स्वस्त बसलो आहोत संविधान धोक्यात आहे,आपली जबाबदारी ओळखणे, समाजाला जागृत करण्याचे संघटनेचे काम आहे असे विचार व्यक्त केले तर विश्वनाथ (अण्णा )तोडकर यांनी याप्रसंगी बोलताना पुन्हा बुलंदीवर जायचे असेल तर घटनेचा जयघोष व्हावा कायद्याची भाषा व चळवळीचे गीत गायन व्हावे असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.सोमनाथ कदम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात मातंग समाजाने अमानवीय धर्माचे ओझे सोडावे, व्यवस्था बदलली पाहिजे समतावादी ,न्यायवादी व संविधान वादी व्यवस्था असायला हवी अन्यायाची चीड आली पाहिजे चळवळीमुळे प्रगती होते परिवर्तनाचा मार्ग डॉ.बाबासाहेबाचा आहे, आपल्या साहित्यातून हाच विचार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मांडला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व पासवर्डची मातंग समाजाला गरज आहे असे सांगितले या कार्यक्रमात मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह पेन व रजिस्टर देऊन सत्कार करण्यात आला तर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विश्वनाथांना (अण्णा) तोडकर, (सामाजिक कार्य) माधवसिंग राजपूत (पत्रकारिता ) रामभाऊ लागाडे (सामाजिककार्य ) डॉ. भक्ती कल्याणकर (आरोग्य) बापू भंडारे (शिक्षण) यांचा शाल, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला, या कार्यक्रमात एल.आर. धावारे, डॉ. भक्ती कल्याणकर, रामभाऊ लगाडे, श्रावण क्षीरसागर, प्रकाश कांबळे, यांनी आपले विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिलीप मोरे तालुकाध्यक्ष लसाकम, तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सोमनाथ कसबे, यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, बापू भंडारे, शिवाजी कसबे, दत्ता गायकवाड, दत्ता ताटे, दत्ता कांबळे, यश पाटुळे, नानासाहेब ताटे, प्रकाश कांबळे, यांनी परिश्रम घेतले.
