बरमगाव येथे लोकशाहीर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात साजरी

बरमगाव येथे लोकशाहीर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात साजरी

Spread the love



धाराशिव तालुक्यातील बरमगाव  येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत क्रांती चौकाचे भव्य उद्घाटन तसेच प्रसिद्ध शाहीर प्रभाकर आगळे यांचा शाहिरी जलसा रंगला.

गावचे सरपंच बाळकृष्ण गोरे व उपसरपंच पोपट ढवळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाहीर प्रभाकर आगळे यांनी आपल्या सशक्त सादरीकरणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पोवाडे, भीमगीते व सामाजिक संदेश देणारे शाहिरी कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमात मुख्य प्रतिमापूजन बेंबळी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश पाटील साहेब व जय लहुजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पवन भैय्या पोळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गावातील नागरिकांसह जय लहुजी प्रतिष्ठान व लहू रत्न प्रतिष्ठानचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांती चौकाच्या फलकाचे उद्घाटनही या कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी बळीराम शिरसाटे, परमेश्वर आप्पा कांबळे, अमर आगळे, विद्याताई माने, विशाल कसबे, अभिषेक कांबळे, श्याम रसाळ, नितीन कांबळे, महादेव कांबळे, प्रदीप कांबळे, आसरा जे. आगळे, शहाजी आगळे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

जय लहुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर आगळे यांनी लहान मुलांसाठी खाऊ वाटपाचे आयोजन केले होते. तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागतही करण्यात आले. “जय अण्णाभाऊ”, “जय लहुजी” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन गोविंद कांबळे सर आणि शाहीर प्रभाकर आगळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक आगळे, सुरज कांबळे, दिनेश रसाळ, अनिकेत कसबे, प्रल्हाद आगळे, शुभम आगळे, नितीन आगळे, वीर कांबळे, आदित्य कांबळे, ओमकार कसबे, संतोष दणाने, श्याम रसाळ, अभिषेक कांबळे, विशाल कसबे, राज शिरसाटे, अक्षय आगळे, विलास कांबळे आदी कार्यकर्ते व महिला वर्गाने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *