बेकायदेशीर गोवंश वाहतुकीप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल
लोहारा, दि. २४ मार्च २०२५ – लोहारा पोलीसांनी बेकायदेशीररित्या गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सय्यद अंजीर जानुमियॉ (वय ३०, रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव) याने दिनांक २३ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता छोटा हत्ती (वाहन क्रमांक एमएच ४२ एम ६४१२) मध्ये दोन बैल बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लोहारा आश्रमशाळेजवळ कारवाई करत सदर वाहन ताब्यात घेतले.
या कारवाईत एकूण ९०,००० रुपये किमतीचे दोन बैल आणि २,४०,००० रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. वाहतुकीदरम्यान जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने त्यांची वाहतूक केली जात होती.
या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत कलम ११(१), ११(डी), ११(१)(ई), ११(१)(एच) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
