दरोड्याच्या तयारीत असलेले तीन इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दरोड्याच्या तयारीत असलेले तीन इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Spread the love

धाराशिव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रगस्तीदरम्यान तेरणा सहकारी साखर कारखाना परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य, कट्यारी, कटावणी, कटर, रोख रक्कम आणि तीन मोबाईलसह एक मोटरसायकल आढळून आली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

संशयितांची नावे संतोष प्रभाकर कुराडे, अविनाश प्रभाकर कुराडे आणि प्रविण राजाराम मोरे अशी असून, हे तिघेही सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या विरोधात धाराशिव आणि सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे.

संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे ढोकी येथे गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईत मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *