लोहारा तालुक्यात 21 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
लोहारा : लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 21 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 21 मार्च 2025 रोजी रात्री 11:15 वाजता पीडिता घरात असताना गावातीलच एका तरुणाने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती केली.
या घटनेनंतर आरोपीने पीडितेच्या आई व भावास शिवीगाळ केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी 22 मार्च 2025 रोजी पीडितेच्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 64(1), 69, 115(2), 352, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
