राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा आढावा व अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनाची बैठक संपन्न…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा आढावा व अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनाची बैठक संपन्न…

Spread the love


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे ( दि.19 ) धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बैठक घेण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील,प्रदेश सचिव गोकुळ तात्या शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व राष्ट्रवादी अजित दादा प्रेमी यांची  बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्ष वाढीसाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी  आपले मनोगत पक्षाचे प्रमुख नेते यांच्या समोर मांडले.
उपस्थित बैठकीमध्ये मान्यवरांनी उपस्थित यांना काही सूचना केल्या.  आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष मजबूत होण्यासाठी पक्षातील कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला लागावे असे या बैठकीमध्ये सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानमाला, वृक्षारोपण, रक्तदान, विद्यार्थ्यांना  वह्या वाटप, मोफत आरोग्य व नेत्र रोग तपासणी शिबिर, लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म भरणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती, महिलांची आरोग्य तपासणी महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर अशा प्रकारे जिल्ह्यामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रम पक्षा च्या वतीने राबविण्यात येणार आहेत. अजित दादा यांचा वाढदिवस संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात “अजित पर्व” सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष समयोद्दीन मशायक, प्रवीण यादव,प्रदेश संघटक सचिव खलील पठाण,कळंब तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,परंडा तालुका अध्यक्ष अमोल काळे,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,कळंब शहर अध्यक्ष दत्ता तनपुरे,महिला जिल्हाध्यक्ष सरला खोसे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,किसान सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश बावने,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सलीम हन्नुरे,उदय चंद्र खंडागळे,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,  तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष संदिप गंगणे
युवक जिल्हा सरचिटणीस शमसोद्दीन जमादार,धाराशिव महिला तालुकाध्यक्ष रंजना भोजने,वाशी महिला तालुकाध्यक्ष लता सातपुते,कळंब युवक तालुका अध्यक्ष अमर मडके ,तुळजापूर सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष विनोद जाधव,तुळजापूर  विद्यार्थी तालुकाध्यक्ष सोहेल बागवान,वाशी आदिवासी सेल तालुकाध्यक्ष विशाल काळे,अल्पसंख्यक धाराशिव तालुकाध्यक्ष नासिर शेख ,धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख,धाराशिव शहर कार्याध्यक्ष पठाण अकबरखान गुलाब खान,धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष उषा लागडे,धाराशिव युवक तालुकार्याध्यक्ष वैभव मोरे,धाराशिव युवक शहर कार्याध्यक्ष संदिप बनसोडे,धाराशिव महीला शहर अध्यक्ष सुलोचना जाधव,धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी, धाराशिव अल्पसंख्यांक महिला शहर अध्यक्ष अमीना शेख,धाराशिव अल्पसंख्यांक महिला शहर कार्याध्यक्ष निलोफर सय्यद,धाराशिव तालुका सरचिटणीस प्रकाश बालकुंदे,धाराशिव तालुका सचिव कलीम शेख,अंबेजावळगा जि.प गट प्रमुख सुरेश राठोड, सोशल मीडिया सुहास मेटे,जुबेर शेख,सौरभ देशमुख,शाहू धावारे ,कमलाकर बनसोडेअंबादास वाघमारे,नवनाथ सातपुते,श्रीराम जगदाळे ,रंजीत गायकवाड ,शैलेंद्र शिंगाडे, प्रज्योत बनसोडे, सखाराम जाधव, अरफात पठाण, सय्यद नामोन,सुभाष कदम आधी पदाधिकारी कार्यकर्ते व राष्ट्रवादी अजित दादा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *