
धाराशिव येथे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांचा लाकाळ यांच्या हस्ते सत्कार
धाराशिव: पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त आलेल्या तब्बल १० लाखापेक्षाही अधिक वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी व उपचार केल्याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा . डॉ. तानाजीराव सावंत यांचा शिवसेनेचे धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ- पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
धाराशिव येथे ना. सावंत गुरूवारी (दि.१८) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी श्री लाकाळ- पाटील यांनी पालकमंत्री सावंत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून स्वागत केले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल खोचरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, सुरज साळुंखे, गौतम लटके आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.