आर. पी.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश

आर. पी.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश

Spread the love



धाराशिव प्रतिनिधी-डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी, धाराशिव, येथील आर.पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल एज्युकेशन अँड रिसर्च  (NIPER) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये पाच विद्यार्थी विशेष प्राविण्यासह चमकले.यामध्ये कु.दिव्या पानढवळे ( AIR.2330), कु.अंकिता वीर( AIR.3148), कु.तेजल माकोडे ( AIR.3844), कु.प्रतिक्षा तुकशेट्टी (AIR. 4949) व कु.अंकिता गाढवे ( AIR. 5036). या सोबतच इंडियन फार्मासुटिकल काँग्रेस हैदराबाद येथे घेण्यात आलेल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मध्ये पल्सेस फार्मासुटिकल मध्ये प्रशिक्षण अधिकारी म्हणून कु.धनश्री भोगे व कु. मोनिका हावळे या विद्यार्थिनींची निवड झाली आहे. या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील  व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाझी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *