ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ कार्यक्रम व महिला कार्यकारणी जाहीर
कार्यक्रमाची सर्व जबाबदारी महिला शक्तीकडे
सांस्कृतिक व धार्मिक, आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रम
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्री देवीजींच्या मुर्तीची व घटस्थापना स्थापना शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाकरे नगर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. तसेच विधीवत घटस्थापना, किर्तन, दांडिया, खेळ पैठणीचा, मेहंदी स्पर्धा, गालीचा रांगोळी प्रशिक्षण, रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा व राजस्थान येथील डॉक्टरांच्या टीमचे सलग सहा दिवस फिजिओथेरपी आरोग्य उपचार शिबिर यामध्ये डायबेटीस, बीपी ल गुडघे दुखी यावर उपचार करण्यात येणार आहेत. तर नामवंत गायकांची आराधी गीते सादर होणार आहेत. या विविध धार्मिक कार्यक्रमासह दि.२४ ते ३० सप्टेंबर दरम्यान फिजिओथेरपी उपचार करण्यात येणार आहेत.
ठाकरे नगर येथे घेण्यात आलेल्या बैठकीस मुख्य आयोजक संस्थापक अध्यक्ष देवी भक्त प्रशांत उर्फ बापू साळुंके यांच्या मातोश्री आणि या महोत्सवाच्या मुख्य आधारस्तंभ श्यामल साळुंके आदींसह २०० महिलांची प्रमुख उपस्थिती होती. याबाबत अधिक माहिती देताना साळुंके म्हणाले की, नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी मंदिरातून धाराशिव येथील ठाकरे नगरमध्ये शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी देवींची ज्योत पायी आणण्यात येणार आहे. तर आदी शक्ती पिठातील देवींच्या मंदिरातील धानाचे वाण आणून घटस्थापना नायब तहसिलदार…. यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करुन करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे नगर नवरात्र महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी दिली आहे.
तसेच या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सौ सुरेखाताई खांडेकर यांच्यावर तर उपाध्यक्षपदी सौ प्रतिभा गाडे व सचिवपदी सौ सत्यशिला गायकवाड तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून सौ योजना सलगर, सौ पूजा वाघमारे यांची तर रांगोळी प्रमुख सौ सुरेखा पवार, सौ योगिता निलंगे यांची व आरती नियोजनाची जबाबदारी सौ दीपाली गायकवाड यांच्यावर तर भोगी प्रमुख म्हणून सौ मिनाक्षी महामुनी, सौ सत्यभामा खोत तसेच देवी आणण्याची जबाबदारी सौ रेखा शिंदे यांच्या खांद्यावर दिली आहे. तर स्पर्धा प्रमुख म्हणून सौ लता राठोड व सौ कोमल कदम या काम पाहणार असून महाप्रसादाचे नियोजन सौ रुक्मिणी सुर्यवंशी सीमा कदम या करणार आहेत. तसेच होम विधी नियोजन सौ इंदू जगताप, सौ सत्यशिला गायकवाड, सौ उषा गायकवाड व सौ राणी माळी या पाहणार आहेत. तर दांडिया प्रमुख म्हणून सौ अरुणा झरकर व सौ राणी माळी या जबाबदारी निभावणार आहेत. तसेच आराधी गीत प्रमुख म्हणून विमल साठे व सौ देडे ताई यांची टीम विविध पारंपरिक देवी गीते सादर करणार आहेत. तर कुंकू मार्चनची जबाबदारी सौ अनिता पवार व सौ अनारकली शिंदे यांच्यावर सोपवली आहे. तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून सौ सीमा कदम, सौ वर्षा डोके, सौ निकिता सिरसट, सौ शितल कसपटे, चौधरी व सौ अनिता शेंडगे या निभावणार आहेत. तर फराळाच्या नियोजनाची जबाबदारी सौ उषा गायकवाड व सौ मिनाक्षी महामुनी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी केले आहे.
