धाराशिव जिल्हा पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यासाठी पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

धाराशिव जिल्हा पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यासाठी पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

Spread the love


धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यातील पुरातत्वीय व पर्यटन स्थळाविषयी जनजागृती पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने करण्यात येत असुन धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखडा मंजुर करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या मार्फत आरडिसी शोभा जाधव यांच्याशी चर्चा करुन देण्यात आले, निवेदनात म्हटले की, धाराशिव जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या अनेक संधी आहेत,जिल्ह्याला लाभलेले नैसर्गिक वरदान आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा पर्यटन दृष्ट्या विकास केल्यास जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळु शकते,हा विचार करुन पर्यटन जनजागृती संस्था नोंदणीकृत असुन मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे.यात पर्यटन स्थळांची स्वच्छता, पर्यटन स्थळाच्या ठिकाणी वृक्षारोपण,चित्र प्रदर्शन, भित्तीपत्रके, माहिती पत्रके, अशा प्रकारचे जनजागृती करण्यात येते, धाराशिव जिल्ह्यात पर्यटन व खाद्य महोत्सव,परंडा किल्ला नळदुर्ग किल्ल्याचा पर्यटन दृष्ट्या विकास, हातलाई धाराशिव लेणी टुरिझम, जैन टुरिझम सर्किट विकसित करणे,जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंग शिवदर्शन सर्किट,तेर येथे ऐतिहासिक पुरातत्व धार्मिक स्थळांचा व परिसरांचे जतन, जिल्ह्यात कौशल्य विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, पर्यटन गाईड प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, जिल्ह्याच्या ठिकाणी पुराण वस्तू संग्रहालय उभारणी/निर्मिती करणे अशा अनेक बाबींचा विचार करून जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात यावा, तसेच तत्कालीन पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सोबत आॅनलाईन झुम मिटींग मध्ये ठरल्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्याचा पर्यटन विषयक प्राधान्य क्रमाचा प्राथमिक आराखडा नुसार पर्यटन विकास आराखडा मंजुर करण्यासाठी पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव सातत्याने प्रयत्न करीत आहे, निवेदन देतांना सचिव देविदास पाठक, कार्याध्यक्ष रणजित रणदिवे, सहसचिव अब्दुल लतिफ,उपाध्यक्ष गणेश वाघमारे,कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग,सदस्य विजय गायकवाड,गुलचंद व्यवहारे,फेरोज पठाण अन्य इतर उपस्थित होते.तर निवेदनावर अध्यक्ष युवराज नळे, मार्गदर्शक डॉ अभय शहापुरकर,अभिमान हंगरगेकर, राजाभाऊ कारंडे यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *