धाराशिव शहरातील 59 रस्त्यांची सुवर्णजयंती नगरोथान महाभियान योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर व तात्काळ निविदा करून काम सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांचे आदेशशिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची माहिती

धाराशिव शहरातील 59 रस्त्यांची सुवर्णजयंती नगरोथान महाभियान योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर व तात्काळ निविदा करून काम सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांचे आदेश

शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची माहिती

Spread the love



धाराशिव दि.17 (प्रतिनिधी) – धाराशिव नगर परिषदेअंतर्गत सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत झालेल्या भुयारी गटारीच्या कामानंतर शहरातील 59 रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी 140 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मंजूर केला असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली आहे. ही कामे ऑगस्ट महिन्यात चालू होतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार उपस्थित होते

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार, धाराशिव चे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेमुळे शहराची झालेली वाईट अवस्था मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच खराब झालेले मुख्य 59 रस्ते त्यासाठी 140 कोटी कोटी रुपयांचा विकासनिधी आवश्यक असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी मुख्यमंत्री महोदयांना सांगितले. त्यानंतर या कामांना तात्काळ मंजुरी देऊन तब्बल 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख श्री.साळुंके यांनी दिली.

मंजूर झालेल्या कामांमध्ये 1) गणेशनगरअंतर्गत शहाबादे हॉटेल ते राष्ट्रीय महामार्ग 52 रस्ता व नाली, 2) गणेशनगर अंतर्गत पल्लवी हॉस्पिटल ते हुकेरे घर रस्ता व नाली, 3) मदिना चौक ते शम्स चौक ते ताज चौक रस्ता व नाली, 4) तालीम गल्ली अशपाक घर ते भारत विद्यालय ते विजय चौक रस्ता व नाली, 5) सारनाथ चौक ते जरिया फंक्शन हॉल रस्ता व नाली, 6) सारनाथ चौक ते सर्वे नंबर 116 रस्ता व नाली, 7) ताज चौक ते आझाद चौक ते जिल्हाधिकारी निवासस्थान ते संत गाडगेबाबा चौक रस्ता व नाली, 8) तहसिलदार निवासस्थान ते मारवाडी गल्ली अजमेरा यांचे घर रस्ता व नाली, 9) जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार पटेल शॉपिंग सेंटर ते लेडीज क्लब रस्ता व नाली, 10) अंबाला हॉटेल ते सर्वे नंबर 14 ओपन स्पेस ते डंबळ हॉस्पिटल रस्ता व नाली, 11) शिंगाडे गिरणी ते गणपती मंदिर ते संविधान चौक ते सुधीर पाटील पेट्रोल पंप रस्ता, 12) नृसिंह मंदिर ते सिंचन भवन रस्ता, 13) छत्रपती संभाजी महाराज उद्यान ते फुलसे यांचे घर रस्ता व नाली, 14) मेन रोड ते बी अ‍ॅन्ड सी ऑफिस रस्ता, 15) शेरखाने पूल ते राष्ट्रीय महामार्ग 52 रस्ता, 16) जुना हायवे ते ग्रीनलॅन्ड शाळा ते वीर वकील यांचे घर रस्ता व नाली, 17) भारत गॅस गोडावून ते विनोद काकडे यांचे घर रस्ता, 18) राहुल बागल शॉपिंग सेंटर ते भोगावती नदी रस्ता व नाली, 19) डीआयसी रोड ते खोचरे यांचे घर ते बांगड रो हाऊस रस्ता, 20) रामकृष्ण पेट्रोल पंप (डीआयसी) ते अष्टविनायक चौक रस्ता व नाली, 21) विजय चौक ते जुनी गल्ली रस्ता व नाली, 22) देशपांडे स्टॅन्ड ते आझाद चौक रस्ता, 23) ताज हॉटेल ते माऊली चौक ते यशपाल सरवदे यांचे घर रस्ता व नाली, 24) ताजमहल टॉकीज ते काळा मारुती चौक ते जिल्हा रुग्णालय चौक रस्ता व नाली, 25) सह्याद्री कॉर्नर ते पंचायत समिती ऑफिस मेन रोड रस्ता, 26) भानूनगर मधील मुख्य रस्ता रस्ता व नाली, 27) राष्ट्रीय महामार्ग ते साठे यांचे घर रस्ता, 28) धाराशिव नाका पाठीमागील जीएसडीसमोरील व बाजुचा मुख्य रस्ता येथे रस्ता व नाली, 29) माऊली चौक ते अ‍ॅड.विजय शिंदे यांचे घर ते माने यांचे घर ते घोगरे यांचे घर रस्ता, 30) नगर परिषद शॉपिंग सेंटर ते जिल्हा रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर रस्ता व नाली, 31) एन. कठारे ते भन्साळी-मंत्री दुकान रस्ता व नाली, 32) भारत विद्यालय ते लोहार गल्ली मार्गे जिजामाता उद्यान रस्ता व नाली, 33) गालीब नगर अंतर्गत मुख्य रस्त्यावर रस्ता व नाली, 34) शिरीन कॉलनी अंतर्गत मुख्य रस्त्यावर रस्ता व नाली, 35) मिल्ली कॉलनी अंतर्गत मुख्य रस्त्यावर रस्ता व नाली, 36) सुलतानपुरा अंतर्गत मुख्य रस्त्यावर रस्ता व नाली, 37) रजा कॉलनीअंतर्गत मुख्य रस्त्यावर रस्ता व नाली, 38) मेन रोड ते जाधववाडी रस्ता, 39) पोहनेर ते केकस्थळवाडी जोडणारा मुख्य रस्ता, 40) अमन इलेक्ट्रॉनिक्स ते जुना उपळा रोड रस्ता, 41) स्मशानभूमी ते मिटकरी यांचे घर रस्ता, 42) नगर परिषद शाळा क्र. 21 ते बोरकर यांचे घर रस्ता, 43) संभाजी चौक ते अष्टविनायक चौक रस्ता, 44) विकास नगर अंतर्गत रस्ता व नाली, 45) सह्याद्री कॉर्नर ते सकाळ ऑफिस गोवर्धन यांचे घर रस्ता व नाली, 46) मुख्य रस्ता ते आठवडी बाजारमधून एमएसईबी स्टेशनपर्यंत मुख्य रस्त्यावर रस्ता व नाली, 47) एलआयसी ऑफिस ते सबस्टेशनपर्यंत मुख्य रस्त्यावर रस्ता व नाली, 48) चंद्रभागा नगर अंतर्गत रस्ता, 49) लहुजी वस्ताद साळवे चौक ते महात्मा फुले चौक रस्ता व नाली, 50) राष्ट्रीय महामार्ग 50 (गॅसपंप) ते साठे यांचे घर रस्ता, 51) शिक्षक कॉलनी अंतर्गत रस्ता व नाली, 52) नारायण कॉलनी अंतर्गत रस्ता व नाली, 53) शिंदे सांजा रोड ते राष्ट्रीय महामार्ग 52 ते कोळी यांचे घर ते भोसले यांचे घर रस्ता व नाली, 54) दत्त कॉलनी अंतर्गत कदम पीठाची गिरणी ते काकडे यांचे घर रस्ता, 55) डेक्कन कॅम्पस अंतर्गत रस्ता, 56) साई कॉलनी अंतर्गत मुख्य रस्ता व नाली, 57) शिवसृष्टी अंतर्गत मुख्य रस्ता व नाली, 58) सांजा रोड, एसटी कॉल्नी अंतर्गत जोगडे यांचे घर ते डोके कोटा रस्ता व नाली, 59) समर्थ नगर अंतर्गत रस्ता व नाली या कामांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *