
धाराशिव शहरातील रस्ते दुरुस्ती करणेबाबत शहरवासीयांचे आमदार राणादादांना साकडे
उद्या दि.16 रोजी रस्त्यांची पाहणी करणार..
धाराशिव शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. पावसामुळे नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली असून महिला, लहान मुले, वृद्ध नागरिकांना याचा जास्त त्रास होतो आहे..
नगरपालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही असे न. प. प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने सदर प्रश्नामध्ये लक्ष घालावे असे निवेदन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना नागरिकांकडून प्राप्त झाले.. या अनुषंगाने उद्या दिनांक 16/07/2024 रोजी सकाळी 10 वा. संबंधित रस्त्यांची आमदार राणाजगजितसिंह पाटील पाहणी करणार आहेत. तरी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.