
आमदार पुत्र अपघातग्रस्त महिलेच्या मदतीला धावले, स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोचवले
कळंब शहरात अपघातग्रस्त महिलेला दिला मदतीचा आधार
कळंब शहरात आज दुपारी दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा अचानक अपघात झाल्याने जखमी झाली. त्याचवेळी बाजूने जात असलेल्या मेघ राणाजगजितसिंह पाटील यांचे महिलेकडे लक्ष गेले आणि त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त महिलेला आधार दिला तसेच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने स्वतः च्या गाडीतून रुग्णालयात पोचवले. महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या घटनेनंतर अपघातग्रस्त महिलेची चप्पल हाताने उचलून देत सर्वसामान्यांप्रमाणे वागणाऱ्या आमदार पुत्राच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं जात आहे.